दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची कृपा मिळावी, घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे काही उपाय केल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीचा आर्शिवाद कायम राहील. घरातील द्ररिद्रता, नकारात्मकता दूर होऊन पैशांची भरभराट होईल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते असं म्हणतात. ज्याच्या पूजेने ती प्रसन्न होते त्या घरात ती वास करते. त्यामुळे या दिवशी प्रत्येक जण माता लक्क्षी आपल्यावर प्रसन्न व्हावी, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करतो.