कर्नाटक सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत केलेल्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्धारित 20% पेक्षा अधिक, काही नमुन्यांमध्ये तब्बल 31% पर्यंत इथेनॉल आढळल्याचा दावा कर्नाटक सरकारने केला आहे. या अहवालामुळे वाहनचालकांना मिळणाऱ्या इंधनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेल कंपन्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल मिसळण्यात आल्याचा गंभीर आरोप कर्नाटक सरकारने केला आहे.