गुरनूर ब्रारवर वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू भलताच खुश.... BCCI ला दिला खास सल्ला. Gurnoor Brar NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा गोलंदाज गुरनूर ब्रार यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्याने न्यूझीलंडचे ४ फलंदाज बाद करत त्यांचा डाव १३४ धावात रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. गुरनूर ब्रारने पहिल्या सामन्यात देखील चांगला मारा करत आपला चुणूक दाखवली होती.