मुदाळतिट्टा - महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळू मामांच्या मेंढरांचे शनिवार दि. 7 ऑक्टोंबर. 7 ऑक्टोंबर रोजी आदमापूर येथे आगमन झाले. ढोलक कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडार्याच्या मुक्त हस्ते उधळणीत, फटाक्यांची आतिषबाजीत उत्साही भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. .बाळुमामा भक्तनिवासपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाळुमामा मंदीर, हनुमान मंदिर मार्गे मरगुबाई मंदिर परिसरात हा मेंढराचे(बकर्याचा) कळप स्थिरावला. मार्गावरुन बाळुमामाची पालखी जात असताना सुहासिनींनी औक्षण केले.