Chandrapur Nippon Denro Projectचंद्रपूर: तब्बल ४० वर्षांपूर्वी निप्पॉन डेंरो प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीवर अद्यापही अपेक्षित उद्योग उभे राहिले. दुसरीकडे, याच जमिनीवर आता नवीन उद्योगांचे काम सुरू झाले असताना मूळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळालेला नाही. या अन्यायाचा निषेध नोंदविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चक्क आपल्या अधिग्रहित जमिनीवर दिवे लावून सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनातून वाढीव मोबदला आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली..