ठाणे: ठाणे शहरातील पाचपाखाडी, नितीन कंपनी, कामगार हॉस्पिटल आणि घोडबंदर रोडवर शेअर रिक्षाचालकांनी अचानक केलेल्या भाडेविरोधात भाजपच्या आमदार ॲड. माधवी संजय नाईक य. माधवी संजय नाईक यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणी त्यांनी `आरटीओ'कडे तक्रार केल्यानंतर प्रवाशांची दररोज ५ ते १० रुपयांची लूट करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात भरारी पथकाच्या साह्याने कारवाई केली जाणार आहे. .ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूकडून शहरातील अनेक मार्गावर शेअर रिक्षा धावतात.