Nashik Crime News: कुटुंबाच्या प्रतिष्ठेखातर खुनाची घटना घडली की, आणखी काही कारण आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगावमध्ये 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणाची हत्या (Nashik Crime News) करण्यात आल्याची माहिती आहे. आर्यन सोमनाथ कांबळे (18) असे हत्या (Nashik Crime News) झालेल्या तरुणाचे नाव आहे.