Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग तरुणाचा जीव वाचवण्यासाठी धावला दुसरा तरुण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं? Mumbai Railway Train Accident: मुंबई उपनगरातील विक्रोळी रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी एक थरारक प्रसंग पाहायला मिळाला. याठिकाणी एक तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) उभा होता. मात्र, दुसऱ्या एका प्रवाशाने वेळेत चपळाई दाखवून या तरुणाला रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला खेचले. त्यामुळे संबंधित तरुणाचा जीव थोडक्यात वाचला.