Kolhapur Crime News: इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून निर्घृण खून करण्यात आला. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग मनात धरून आरोपीने मंदार रानडे यांचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.