सोलापूर : भैरवनाथ शुगर प्रशासनाने प्रतिटन २०० रुपये थकीत ऊसबिल देण्याचे आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. भैरवनाथ शुगरने गतवर्षी साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. प्रतिटन तीन हजार रुपये दर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात २८०० रुपये दराने बिल अदा करण्यात आले. त्यामुळे प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांचे सुमारे सात कोटी रुपये थकीत असल्याचा दावा युवराज घुले यांनी केला.