हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका किमरी जॉनसनचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. हार्ट ॲन्युरिझम या दुर्धर आजाराशी झुंज देताना तिची प्राणज्योत मालवली. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि अभिनयाचा सुरेख संगम असलेली हॉलिवूड अभिनेत्री किमरी जॉनसनने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी तिला मृत्यूने कवटाळले. हार्ट ॲन्युरिझम या दुर्धर आजाराशी गेल्या काही दिवसांपासून ती झुंज देत होती. तिच्या जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.