cm devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करणार आहे. त्यानंतर उद्या त्यांच्यासोबच दिवाळी साजरी करणार आहेत. राज्यात यंदा शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा संकटात सापडला आहे. याच शेतकऱ्याला सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा धावून आले आहेत.