IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंड टूरमध्ये टीम इंडियासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे चेहरे खेळताना दिसतायत. जी बाजू कमकुवत ठरेल असं वाटलेलं तीच ताकद बनलीय. टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी20 सीरीज भारतीय संघाने 3-2 ने जिंकली. न्यूझीलंड दौऱ्यात बीसीसीआच्या सिलेक्शन कमिटीने बऱ्याच खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे टीम एखाद-दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून नाहीय.