पतियाळा; वृत्तसंस्था : पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यात शुक्रवारी ‘कर्मभूमी एक्स्प्रेस’ला भीषण आग लागल्याची घटना घडली. सराय बंजारा रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेच्य. सराय बंजारा रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेच्या तीन डब्यांना आगीने वेढले, तर चौथ्या डब्याचे अंशतः नुकसान झाले. काही प्रवाशांनी डब्यातून उड्या घेत जीव वाचवला. या घटनेत सुमारे १,५०० प्रवाशांनी सुखरूप बाहेर पडत जीव वाचवला..सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही.