फोटो-27361 येवला : विणकर महिलांना धनादेशाचे वितरण करताना नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मनोज दिवटे आदी. ६ : शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत हातमाग विणकर महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या गणेशोत्सव भत्ता योजनेचे धनादेश वितरण करण्यात आले. या वेळी तब्बल १२० विणकर महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात हा कार्यक्रम झाला. योजनेंतर्गत पात्र हातमाग विणकर महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.