मतदान ओळखपत्र पाहून मिळणार योजनांचा लाभ... आधार कार्डला नाही 'आधार'; राहुल गांधींनी 'तो' Video केला शेअर. Rahul Gandhi Voter id For Scheme: काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ भाजपचे केंद्रीय मंत्री लल्लन सिंह यांचा आहे. या आधारे त्यांनी आता सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड नाही तर मतदान कार्ड पाहून योजनांचा लाभ मिळणार आहे असा दावा केला.