Raju Shetti Protest Sugarcane Farmers: आंदोलन मागे घेतल्यानंतर आता महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली असून वाहनांची कोंडीही कमी झाली आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, तब्बल 61 तासानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. किणी टोल नाका इथं राजू शेट्टीनी घोषणा केली.