Eknath Shinde Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीसाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे ब्रीच कँडीमध्ये दाखल झाले आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पुर्वनियोजित नव्हता, आज नियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शरद पवारांना भेटण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन केल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.