पुणे शहराच्या बालेवाडी परिसरातील म्हाळुंगे-बालेवाडी पट्ट्यात बहुचर्चित असलेल्या ‘कस्तुरी स्पेसेस’ या बांधकाम प्रकल्पासाठी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तब्बल ६५० मीटर लांबीचा सार्वजनिक डांबरी रस्ता विनापरवाना उखडून विद्युत केबल टाकल्याचा अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी पालिकेच्या पथ विभागाने तब्बल २ कोटी ४ लाख ८२ हजार ५६० रुपयांचा अवाढव्य दंड ठोठावला असूनही, मागील तीन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी प्रशासनाला यातील एक रुपयाही वसूल करता आलेला नाही.