सध्या पुणे विमानतळावरून देशातील ३५ ठिकाणांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे : पुणे विमानतळावर हिवाळी वेळापत्रकात विमानसेवांना प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक विमानातील प्रवासी क्षमतेचा वापर ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नियोजित विमान कंपन्यांकडून बहुतांश स्लॉटचा वापर केला जात आहे. त्यामुळे मर्यादित स्लॉट उपलब्ध असतानाही पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीची मागणी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिवाळी वेळापत्रक हाऊसफुल्ल झाले आहे.हिवाळी वेळापत्रक गेल्या आठवड्यापासून लागू करण्यात आले आहे.