इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम जगावर बघायला मिळाला. भारतालाही या युद्धाचा फटका बसला. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणने अमेरिकेला युद्धविरामचा प्रस्ताव दिला. सात अटी या प्रस्तावात ठेवण्यात आल्यात. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत आहे. मात्र, अमेरिकेतील निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठे अपयश मिळाले. त्यातच आता युद्ध थांबण्याच्या दिशेने पाऊल उचलले जात आहे. इराणकडून कतारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला.