पेठवडगाव : ऊस दरप्रश्नी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी रात्री उशिरा चक्का जाम आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. साखर कारखानदारांनी प्रतिटन ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. मात्र, ही रक्कम तीन टप्प्यांत देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांत काही प्रमाणात नाराजी पसरली आहे.