मुंबई : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव, त्यामुळे इराणशी असलेले युद्ध थांबण्याची निर्माण झालेली चिन्हे, कच्च्या तेलाच्या भावात झालेली घट यामुळे गुरुवार (दि. ५) च्या सत्रात शेअर बाजाराने जोरदार दिवाळी साजरी केली. सेन्सेक्स २ हजार ८ आणि निफ्टी निर्देशांक ५७६ अंकांनी वधारला. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच गुंतवणूकदारांवर तब्बल आठ लाख कोटी रुपयांचा धनवर्षाव झाला. त्याचवेळी सराफ बाजारातही मोठी वाढ दिसून आली.