कर्नाल (हरियाणा); वृत्तसंस्था : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे दिलेले आव्हान स्वीकारत केंद्रीय गृहमंत्. रस्त्यांवर राजकीय नौटंकी करण्याऐवजी संसदेत येऊन नियम आणि तथ्यांच्या आधारे समोरासमोर चर्चा करा, असे थेट उत्तर अमित शहा यांनी दिले आहे..भाजपच्या 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाओ'मोहिमेअंतर्गत हरियाणामधील कर्नाल येथे आयोजित भव्य पदयात्रा आणि जाहीर सभेला संबोधित करताना शहा यांनी हे आव्हान दिले.