वॉशिंग्टन : विश्वातील काही सर्वात शक्तिशाली आणि गूढ घटनांचा अभ्यास केल्यानंतर नासाची ‘स्विफ्ट’ दुर्बीण पृथ्वीच्या वातावरणात जळून खाक झाली असून, तिच्या तब्बल २२. ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, या अंतराळ दुर्बिणीने बुधवारी सकाळी ७.३९ वाजता (EST) इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रदेशावर (सुमारे ३.४ अंश उत्तर अक्षांश आणि ९८.६ अंश पूर्व रेखांश) पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना दुर्बिणीचा बहुतांश भाग जळून खाक होईल, अशी ‘नासा’ला अपेक्षा होती.