Ashok Saraf On Salman Khan : अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपली छाप पाडली. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, सलमानसोबत काम करताना त्यांना एकदा जीवघेण्या प्रसंगाचा सामना करावा लागला होता.