या दोन दिवसांत सोन्याचा भाव प्रति तोळा 1.39 लाख रुपयांवरून थेट 1.45 लाख रुपयांवर पोहोचलाय. असे असले तरीही सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 55000 रुपयांनी कमी आहे. धनत्रयोदशी आणि दीपावली सणामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचा भाव वाढलाय. आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 1780 रुपयांनी वाढून तो 1.45 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे.