खानिवडे : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-दुर्गांमध्ये मानाचे स्थान असलेल्या जंजिरे वसई किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरूच असून, आता बालेकिल्ल्याचे मुख्य प. पुरातत्त्व विभागाच्या कथित अनास्थेमुळे या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्वच धोक्यात आले असून, वेळीच संवर्धन न झाल्यास वसईच्या इतिहासाची आणखी एक महत्त्वपूर्ण साक्ष काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे..जंजिरे वसई किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये बालेकिल्ला नामक गढीला विशेष महत्त्व आहे. साधारणतः इसवी सनाच्या बाराव्या शतकात या गढीचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते.