टोकावडे :मुरबाड राष्ट्रीय महामार्ग ६१ वर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल. या घटनांमुळे मुरबाड तालुक्यातील महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा आणि आर.टी.ओ. विभागाच्या कारवाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे..बुधवारी सकाळी सुमारे ६.४५ च्या सुमारास सरळगाव येथील मुक्ताबाई नगरसमोर भरधाव पिकअप वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. नारायणगावहून मुरबाडच्या दिशेने पिकअप येत होती.