Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन ही दुर्घटना झाली, ढिगार्याच्या खाली सापडून महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. कराड, सातारा : कराडजवळील मलकापूर शहरात उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एक मोठी दुर्घटना घडली आहे. मलकापुरातील ढेबेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली असून, पलटी झालेल्या ट्रॉलीखाली (Satara Accident News) 2 दुचाकींसह 2 ते 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.