दिवाळी पर्व... आधुनिकतेच्या काळात मातीच्या पणत्यांची मागणी टिकवण्यासाठी कुंभार बांधवांची धडपड. ॲंकर दिपोत्सवाच्या झगमगाटात पणत्याचा संर्घष ----------------------------------- एलईडी, विद्युत माळांच्या जमान्यात कुंभार उपेक्षित सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर,ता.५ : दिवाळी म्हटले की घराघरांत पणत्यांची रोषणाई आणि दीपोत्सवाचे मंगलमय वातावरण. मात्र, बदलत्या काळात विद्युत दिवे, आकर्षक एलईडी माळा आणि विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची वाढती लोकप्रियता यामुळे पारंपरिक मातीच्या पणत्यांची मागणी टिकवून ठेवण्यासाठी कुंभार बांधवांना संघर्ष करावा लागत आहे.