Nagarjuna First Wife: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्गुन अक्कीेनी हे कायमच चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का नागार्जुन यांची दोन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीसोबत त्यांचा संस्कार फार काळ टिकला नाही. त्यांची पहिली पत्नी कोण होती? जाणून घ्या... नागार्जुन अक्किनेनी हे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे सुपरस्टार नाहीत, तर एक यशस्वी निर्माता आणि प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आज जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबतच नागार्जुन हे स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात.