जळगावच्या सराफा बाजारात दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली. सोन्याचा दर ₹3800 ने वाढून जीएसटीसह ₹1,49,350 वर पोहोचला, तर चांदीचा दर ₹5000 ने वाढत जीएसटीसह ₹2,00,850 प्रति किलोवर पोहोचला आहे. ग्राहकांना वाढलेल्या दराने सोने-चांदी खरेदी करावी लागणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.