पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल तांदूळ किती अधिक फायदेशीर आहे? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी नेमका कोणता तांदूळ फायदेशीर ठरतो याबद्दल अधिक जाणून घ्या. तांदळाच्या तपकिरी आणि पांढऱ्या प्रकारांशिवाय 'लाल तांदूळ' देखील असतो. याचे अनेक फायदे मिळतात, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचाही समावेश आहे. अनेक लोक आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करत आहेत. विशेषतः सध्या लाल तांदूळ जास्त ट्रेंडमध्ये आहे. हेल्दी लाइफस्टाइलवाले आवर्जून हा भात खातात.