MSEDCL team abused and threatened in Satara village छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थकीत वीज बिल वसुली आणि संशयास्पद वीज मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या भरारी पथकाला अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्या घरात का घुसलात, तुम्ही फक्त विशिष्ट समाजाच्या घरचे मीटर चेक करता का? असा जाब विचारत प्रकरणाला थेट धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला.