तेलंगणातील रुग्णालयातून चोरी, धागा सापडला चंद्रपुरात! चार व्हेंटिलेटरच्या प्रकरणात संशयित ताब्यात. 👇 #Chandrapur #Adilabad #News34 #CrimeNews. चंद्रपूर – रिम्स व्हेंटिलेटर चोरी प्रकरणातील संशयिताला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तेलंगणातील आदिलाबाद येथील रुग्णालयातून चार व्हेंटिलेटर चोरीला गेले होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या उपकरणांची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. चोरी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झाली होती. संशयिताला अंचलेश्वर वार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.