कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा महायुती सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. सत्तेच्या हव्यासापोटी स. सत्तेच्या हव्यासापोटी साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या भावनांना पायदळी तुडवण्याचे काम सरकारने केले आहे. या निर्णयासाठी पुढाकार घेणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही, असा आक्रमक इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला..