कोल्हापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला आता मुदतवाढ मिळण. मुदत संपलेल्या आणि दुष्काळामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित असलेल्या ‘अ’ वर्गातील १८ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे..राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.