विराट कोहलीच्या आक्रमक खेळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजालाही प्रभावित केले. सामना गमावल्यानंतर जेकब डफीने विराटचे कौतुक करत एक खास वक्तव्य केलेआहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये विराटसोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या डफीने नेट्समधील त्याचा अनुभवही सांगितला. ऑकलंडमध्ये आज झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने अवघ्या 51 चेंडूंत 74 धावांची खेळी केली. त्याने यावेळी 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पावसामुळे बाधित झालेल्या या सामन्यात भारताला डीएलएस नियमानुसार 143 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते.