नागपूर : परिस्थितीने दोन्ही पाय हिरावून घेतले, मात्र स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न हिरावून घेऊ शकली नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हैदराबादहून नागपूर गाठल. पोटाची खळगी भरण्यासाठी हैदराबादहून नागपूर गाठले. हाताला काम मिळावे, चार पैसे कमावता यावेत आणि कोणापुढेही मदतीसाठी हात पसरावे लागू नयेत, हीच माफक अपेक्षा मनात होती. मात्र, दिव्यांगत्वामुळे रोजगाराच्या संधी मिळत नव्हत्या. अखेर रेल्वे क्लब चौकात एका सहकाऱ्यासोबत मदतीच्या प्रतीक्षेत दिवस काढण्याची वेळ आली.