किणी (कोल्हापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उसाला पहिली उचल ४५०० रुपये मिळावी या मागणीसाठी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले ऐतिहासिक 'रा. संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही हजारो शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर ठिय्या मांडून महामार्ग पूर्णपणे रोखून धरला आहे..हक्काच्या दरासाठी शेतकरी मागे हटायला तयार नसून त्यांनी संपूर्ण रात्र महामार्गावरच जागून काढली. आंदोलनाची तीव्रता पाहून कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि गावागावांतून शेतकरी महिलांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.