जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी (वर्ग-१) सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या मालमत्तेच. एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानासह बँक लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये अडीच किलोहून अधिक सोने, साडेअकरा किलो चांदी, प्लॅटिनमचे दागिने, लाखोंची रोकड, दोन घरे आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे..