आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधत, आमदार-खासदार विकत घेण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अटी-शर्ती का? असा सवाल त्यांनी केला. दुष्काळ, कर्जमाफीतील त्रुटी आणि लाडकी बहिणी योजनेतील वगळणी यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे.