Mita Vashisht On Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेत्री मीता विशिष्टनं नुकत्याच एका मुलाखतीत सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला आहे. शाहरुख खाननं मीताचा जीव वाचवलेला. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही, तर सहकलाकारांशी असलेल्या चांगल्या वागणुकीसाठीही ओळखला जातो. अशातच आता अभिनेत्री मीता विशिष्टनं एका मुलाखतीत शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल से' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखनं प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला होता.