गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकार आणि व्यावसायिकांना धमकीचे संदेश येत आहेत. अशातच आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बॉलिवूडमधील कलाकार आणि व्यावसायिकांना धमकी देऊन खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वैभव मिश्रा असे या आरोपीचे नाव असून, त्याला बेंगळुरूमधून ताब्यात घेण्यात आले.