Sambhajinagar Diwali 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका बाजार सज्ज झाला असून, यंदा शहरात तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे फटाके विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शहरातील १२ फटाका मार्केटमध्ये एकूण २१८ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या फटाक्यांचे कॉम्बो पॅकग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. न्यू महाराष्ट्र फटका मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एकूण १२ फटका मार्केट आहेत. यंदा या मार्केटमध्ये २१८ फटाक्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.