छत्रपती संभाजीनगर : जालना येथील श्री दुर्गादेवी मंदिराच्या विश्वस्त उर्मिलाबाई श्रीमाळी यांना पदावरून हटविण्याचा धर्मादाय सह आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालय. न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध नसताना केवळ लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यास विलंब आणि प्रशासकीय त्रुटींवरून विश्वस्तपदावरून हटविण्याची कठोर कारवाई करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू, जोशी यांनी नोंदविले. प्रकरण फेरनिर्णयासाठी धर्मादाय सह आयुक्तांकडे पाठविताना ३१ मार्च २०२७ पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले..