Raju Shetty sugercane Agitation: कोल्हापुरात ऊस आंदोलन तापलं, 22 तासांपासून पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक ठप्प, ट्रकचालक संतापले, नेमकं काय घडलं? Raju Shetty Agitation Pune Bangalore highway: ऊसाला 4500 रुपयांचा दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune Bangalore highway) वाहतूक रोखून धरली आहे. परिणामी गेल्या 10 तासांपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.