रॅपिडो आणि ई रिक्षा ज्यांचे परमिट नाहीत, ज्या बेकायदेशीर चालतात. रॅपिडोच्या माध्यमातून बेकायरेशीररित्या प्रवासी वाहन रस्त्यावर आणली जात असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्या गाड्या ताब्यात घेण्याच्या सूचना मी आरटीओला दिल्या असल्याचेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. ठाण्यातील शिवसैनिक प्रदीप पुर्णेकर याच्या राजकीय हत्येवरुन एकनाथ शिंदे यांना उबाठाने घेरल्याचे चित्र आहे.