एमएचटी-सीईटी निकालातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून राजकीय वाद सुरू असतानाच विक्रम पाचपुते यांनी रोहित पवारांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. शिनगारे सरांसोबतच्या संभाषणातील काही भागच प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय होती, हे संपूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट होत असल्याचंही पाचपुते यांनी सांगितलं. सीईटी परीक्षेच्या निकालात पैशांच्या जोरावर फेरफार होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी यावेळी काही ऑडिओ क्लिप आणि शिक्षकांचे स्टिंग ऑपरेशन केलेले दाखवले.